मुंबई : कच्च्या तेलाचा भाव ६८ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला असल तरी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेले नाही. कंपन्यांनी आज सलग २९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले आहेत.
पेटीएम IPO मध्ये अडथळा ; ७१ वर्षीय माजी संचालकाने केला हा गंभीर आरोप
आज रविवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. बिटकॉइनला तेजी ; क्रिप्टोकरन्सी बाजाराची उलाढाल २ लाख कोटी डॉलर्सवर गेली
मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.
सोने-चांदी महागले ; शेवटच्या सत्रात कमॉडिटी बाजारात तेजी, जाणून घ्या आजचा दर
जागतिक कमॉडिटी बाजारात सलग दोन सत्रात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.६५ डॉलरने घसरला आणि ६८.४४ डॉलर प्रती बॅरल झाला. तसेच ब्रेंट क्रूडचा भाव ०.७२ डॉलरने घसरला आणि ७०.५९ डॉलर प्रती बॅरल झाला. कोव्हीड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटने अमेरिका आणि युरोपात डोकंवर काढले आहे. यामुळे निर्बंध कठोर केले जाण्याची शक्यता आहे. परिणामी तेलाच्या मागणी घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पेटीएम IPO मध्ये अडथळा ; ७१ वर्षीय माजी संचालकाने केला हा गंभीर आरोप
आज रविवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.