अ‍ॅपशहर

Petrol Rate Today: कच्च्या तेलाच्या किमती पडल्या, ‘या’ शहरांमध्ये बदलले पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Rate Today: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही आज महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. यासोबतच आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2023, 9:33 am
नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार देशात इंधनाचे दर निश्चित केले जातात. आज ९ मार्च २०२३ रोजी क्रूडच्या किंमतींमध्ये घसरण झाली असून अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल पाहायाला मिळत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत क्रूडच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण झाली आहे. अशा स्थितीत अनेक महिन्यांनंतर सर्वसामान्य वाहनचालकांना दिलासा मिळेल, अशा आशा उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Petrol Diesel Price Today


कच्च्या तेलाचा आजचा भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या दरांबाबत बोलायचे तर WTI कच्च्या तेलाच्या किंमती ०.१६ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह प्रति बॅरल $७६.५४ वर व्यवहार करत असताना ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत आज ०.७६ टक्क्यांची घट नोंदवली गेआली आहे आणि सध्या ते प्रति बॅरल $८२.६६ वर व्यवहार करत आहे.

Success Story: वयाच्या १५व्या वर्षी लग्न, व्हरांड्यातून सुरु केला व्यवसाय... आज ब्युटी क्षेत्रात आयकॉनिक नाव
पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव
या घसरणीनंतरही आज चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत आज पेट्रोल १० पैसे तर डिझेल ९ पैशांनी महागले आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील किमती जुन्याच दरांवर स्थिर आहेत. दरम्यान, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लीटर आणि कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

याशिवाय सरकारी तेल विपणन कंपन्यांनुसार आज अहमदाबादमध्ये पेट्रोल आणि डिझेल ७० पैशांनी स्वस्त होऊन अनुक्रमे ९६.४२ रुपये आणि ९२.१७ रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. तसेच नोएडामध्ये पेट्रोल १० पैसे, तर गुरुग्राममध्ये पेट्रोल २६ पैसे आणि डिझेल २४ पैशानी स्वस्त झाले आहे. आज लखनऊमध्ये पेट्रोल आणि डिझेल ३ पैशांनी स्वस्त होऊन ९६.३३ रुपये आणि ८९.५३ रुपये प्रति लिटरने विकले जात असून रायपूरमध्ये पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी महागले आहे.

भरघोस परतावा आणि दमदार फंड! VPF योजनेद्वारे भविष्यासाठी वाढवा गुंतवणूक, जाणून घ्या सर्वकाही
तुमच्या शहरातील दर कसे तपासणार
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी अपडेट केले जातात. त्यामुळे तुमच्या शहरातील नवीन दर तपासण्यासाठी तुम्ही फक्त एक एसएमएस पाठवूनही जाणून घेऊ शकतात. देशातील बहुतांश सरकारी तेल कंपन्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. जर तुम्ही इंडियन इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर आपल्या शहरातील इंधनाचे दर तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवा. त्याचप्रमाणे BPCL चे ग्राहक पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> ९२२३११२२२२ वर तर HPCL ग्राहकांनी ९२२२२०११२२ वर HPPRICE <डीलर कोड> पाठवावा. यानंतर तेल कंपन्या काही मिनिटांतच मेसेजद्वारे ग्राहकांना नवीन किंमती पाठवतील.

महत्वाचे लेख