अ‍ॅपशहर

Petrol Price Today: पेट्रोलियम कंपन्यांना मोठा धक्का; क्रूड, डिझेल अन् जेट इंधन निर्यातीवर अतिरिक्त कर

Petrol Diesel Rate Today: देशभरातील पेट्रोलियम कंपन्यांना धक्का देत केंद्र सरकारने कच्चे तेल, हायस्पीड डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन म्हणजे एटीएफवर विंडफॉल टॅक्स वाढवला आहे, जाणून घ्या त्याचे काय परिणाम होणार आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2023, 11:00 am
नवी दिल्ली: भारत सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर, हवाई टर्बाइन इंधनावर (एटीएफ) आणि निर्यातीसाठी हाय-स्पीड डिझेलवर विंडफॉल कर वाढवला आहे. कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स १,७०० रुपये प्रति टन वरून २,१०० रुपये प्रति टन करण्यात आला आहे. २ जानेवारीच्या सरकारी आदेशानुसार मंगळवारपासून नवीन दर लागू झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Windfall Tax Raised


डिझेलवरील निर्यात कर ५ रुपये प्रति लिटरवरून ७.५ रुपये, तर एटीएफवरील कर १.५ रुपयांवरून ४.५ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. आदेशानुसार सुधारित कर दर ३ जानेवारीपासून लागू होतील. दर्म्य, पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ‘शून्य’ वर कायम आहे.

जगातील एकतृतीयांश भाग मंदीच्या गर्तेत, चीनची सर्वात भयावह परिस्थिती... IMF चा गंभीर इशारा

विंडफॉल कराचे नवीन दर जाणून घ्या
देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल कर १,७०० रुपये प्रति टन वरून २,१०० रुपये प्रति टन करण्यात आला आहे.
विमान इंधन किंवा जेट इंधनावरील विंडफॉल कर पूर्वी १.५ रुपये प्रति लिटरवरून ४.५ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
याशिवाय निर्यातीच्या हायस्पीड डिझेलवरील विंडफॉल टॅक्स पूर्वी ५ रुपये प्रति लिटरवरून ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे.
पेट्रोलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विंडफॉल टॅक्स म्हणजे काय?
अशा कंपन्या किंवा उद्योगांवर विंडफॉल टॅक्स लावला जातो, ज्यांना काही अटींमुळे मोठा फायदा मिळतो. भारत सरकारने १ जुलै रोजी पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स लागू केला होता. त्यावेळी पेट्रोल आणि एटीएफवर प्रतिलिटर ६ रुपये आणि डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. त्याच वेळी, कच्च्या घरगुती तेलाच्या उत्पादनावर प्रति टन २३,२५० रुपये विंडफॉल नफा कर लादण्यात आला.

सोन्या-चांदीच्या दरांना लागणार 'चार चाँद'! नवीन वर्षात होईल इतका भाव, गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ?

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती आणि रिफायनिंग स्प्रेडवर अवलंबून विंडफॉलचे दर बदलले जातात. लक्षात घ्या की भारत, पाश्चिमात्य देशांनी मान्य केलेल्या ६० डॉलरच्या खाली रशियन क्रूड बॅरल खरेदी करत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर
देशभरातील वाहनचालकांना आज पुन्हा किंचित दिलासा मिळाला असून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत बदल होऊनही देशभरात विशेषतः महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय देशातील प्रमुख महानगरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर कालच्या दरावर स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate Today: कच्चे तेल प्रति बॅरल ८६ डॉलरवर; जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली - पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२ रुपये प्रति लिटर
कोलकाता - पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
चेन्नई - पेट्रोल १०२.६५ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.२५ रुपये प्रति लिटर

राज्यात कोणत्या शहरात किती दर?
नागपूर : पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल १०५.८४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९२.३६ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.०१ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल १०८ रुपये, डिझेल ९५.९६ रुपये प्रति लिटर
परभणी : १०९.४५ रुपये प्रति लिटर, डिझेल ९५.८१ रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल १०६.७७ रुपये प्रति लिटर, डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज