अ‍ॅपशहर

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या

Petrol Diesel Price Today: देशभरातील लाखो वाहनचालक गेल्या १० महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दिलासा मिळण्याची वाट पाहत आहे. पण २१ मे २०२२ नंतर अद्यापही ग्राहकांना कोणतीही आनंदाची बातमी मिळालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमतीनुसार देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित केले जातात.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2023, 9:34 am
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या दरात तेजी-मंदीचे सत्र पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत आजही वाढीने व्यवसाय होताना दिसत आहे. लक्षात घ्या की क्रूडच्या किंमतीमधील बदलांच्या जोरावर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज निश्चित केले जातात. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर लादल्यानंतर त्यांच्या किमती बदलतात. मात्र अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Petrol Price Today


क्रूडचा ताजा भाव
आंतराष्ट्रीय बाजारात आज क्रूडच्या किंमतींबद्दल बोलायचे तर आज पुन्हा कच्च्या तेलाच्या भावात तेजी दिसत आहे. WTI क्रूडचा भाव ०.६३ टक्के वाढून प्रति बॅरल $७७.१६ वर व्यवहार करत आहे. तर ब्रेंट तेल ०.७४ टक्क्यांनी वाढले आणि प्रति बॅरल $८२.२३ वर विक्री होत आहे. या दरम्यान, तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित केले आहेत.

पेट्रोल-डिझेलचा भाव
जगातील बाजारातील क्रूडच्या चढ-उताराचा अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, महानगरांमध्ये अजूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची अधिकृत वेबसाइट, iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार राजधानी दिल्लीत आज १३ मार्च रोजी एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये तर पेट्रोल प्रति लिटर ८९.६२ रुपयांनी उपलब्ध आहे. याशिवाय आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये आहे.

महत्वाचे लेख