अ‍ॅपशहर

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! जाणून घ्या कुठे महाग, कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. चला तर जाणून घेऊया आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेल कुठे स्वस्त आणि महाग झाले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2023, 9:27 am
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरांच्या आधारे देशभरात दररोज पेट्रोल आणि डिलझेच्या किमती अपडेट केल्या जातात. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा जागतिक बाजारात क्रूडच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजीने व्यवहार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली ट्रेड करत असताना, देशभरात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज (सोमवार) २० मार्चपर्यंत स्थिर ठेवल्या आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Petrol-Diesel Price Today in India


कच्च्या तेलाचा आजचा भाव
WTI कच्च्या तेलाची किंमत ०.४५ टक्के वाढून प्रति बॅरल $६७.२६ वर व्यापार करत आहे. त्याचवेळी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत १.१७ टक्क्यांनी वाढून $७३.२८ प्रति बॅरलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या दरम्यान, तेल कंपन्यांनी सोमवार, २० मार्च २०२३ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले असून नव्या किमतीनुसार वाहन इंधनाच्या दरात कुठेही बदल झालेला नाही.

मुकेश अंबानींच्या शेफची सॅलरी आमदारापेक्षाही जास्त, पगाराशिवाय मिळतात अनेक सुविधा; कमाई वाचून हैराण व्हाल
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत कच्चे तेल स्वस्त होऊनही भारतात पेट्रोल डिझेलचे दर का कमी होत नाहीत आणि तेल कंपन्या किती काळ दर स्थिर ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २१ मे २०२२ रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात केली होती. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ९४.२७ रुपये मोजावे लागतील.

खूपच महाग विकले जातात उंटाचे अश्रू, अनेक देशांत संशोधन, फायदे पाहून म्हणाल हा चमत्कारच
पेट्रोल-डिझेलच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूडच्या आधारावर सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज वाहन इंधनाच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार वेगवेगळे असतात.

महत्वाचे लेख