अ‍ॅपशहर

पेट्रोलच्या दरात किरकोळ वाढ

चेन्नई वगळता देशातील प्रमुख महानगरांमध्ये व अन्यत्र पेट्रोलच्या किंमतीत गुरुवारी प्रतिलिटर सहा पैशांची वाढ करण्यात आली. डिझेलच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. चेन्नईमध्ये गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत सात पैशांची वाढ झाली.

Maharashtra Times 21 Sep 2018, 2:55 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम petrol price hike
पेट्रोलच्या दरात किरकोळ वाढ

चेन्नई वगळता देशातील प्रमुख महानगरांमध्ये व अन्यत्र पेट्रोलच्या किंमतीत गुरुवारी प्रतिलिटर सहा पैशांची वाढ करण्यात आली. डिझेलच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. चेन्नईमध्ये गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत सात पैशांची वाढ झाली.

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत बुधवारी वाढ झाली नव्हती. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत सहा पैशांनी वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८९.६० रुपयांवर पोहोचले. तर, डिझेलचे दर प्रतिलिटर ७८.४२वर स्थिर राहिले. राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोलने प्रतिलिटर ८२.२२ रुपयांचा स्तर गाठला आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी ७३.८७ रुपये मोजावे लागत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली असून मुंबईमध्येही पेट्रोल नव्वदी पार करेल, अशी चिन्हे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज