अ‍ॅपशहर

परदेशातून स्वस्त सोने खरेदीचा प्लॅन बनवताय तर आधी नियम जाणून घ्या, नाहीतर एक चूक महागात पडणार

Gold buying from Foreign: दुबईत सोन्यावर कराचा बोजा नसल्यामुळे तिथल्या किमती कमी राहतात. मात्र, परदेशातून भारतात आणल्या जाणाऱ्या सोन्याबाबत सरकारने अटी व शर्ती घातल्या आहेत, ज्याचा परिणाम प्रभावी किंमतीवर होतो.

Authored byप्रियांका वर्तक | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2022, 10:56 am
नवी दिल्ली : दिवाळीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते आणि असे म्हणतात की या काळात केलेली खरेदी पुढेही शुभ फळ देते. या कारणास्तव लोक या काळात सोने खरेदी करतात. सोने हा एक मौल्यवान धातू आहे म्हणजेच त्याच्या किमती नेहमीच उच्च राहतात. यासोबतच भारतात सोन्याच्या खरेदीवर कर आकारला जातो, त्यामुळे किंमती आणखी वाढतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात बाहेरगावी जाणारे किंवा परदेशातून सुट्टीच्या दिवशी घरी येणारे बाहेरील देशातून सोने खरेदी करून देशात आणतात. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे दुबई जिथे कर आकारला जात नाही आणि सोने काहीसे स्वस्त आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Gold buying from Dubai or Foreign Country


धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करताय, त्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित समजून घ्या
त्यामुळे जर तुम्ही देखील दुबई किंवा इतर देशांतून स्वस्तात सोने खरेदी करून भारतात आणण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की परदेशातून सोने आणण्याचे काही नियम आहेत. त्यामुळे स्वस्तात खरेदी केलेले सोने खूप महाग ठरेल. अशा परिस्थितीत जाणून घ्या परदेशातून देशात आणलेल्या सोन्याबाबत नियम आणि अटी काय आहेत.

दिवाळी होईल खास; तुमच्या प्रिय व्यक्तीला सोन्याहून स्पेशल असं गिफ्ट द्या
परदेशातून सोने आणण्याचे नियम
परदेशातून आणलेल्या सोन्यावर भारतात कर आकारला जातो. सोन्यावरील हा कर १२.५ टक्के ते ३८.५ टक्क्यांपर्यंत असतो, जो वेगवेगळ्या प्रकरणांवर लागू पडतो. म्हणजेच तुम्ही परदेशात स्वस्तात सोने खरेदी केले असले तरीही तिथल्या दरांच्या तुलनेत तुम्हाला ते महागच वाटेल. कमी वेळ राहणाऱ्यांना जास्त दर द्यावा लागेल, या आधारावर शासनाच्या तरतुदी तयार करण्यात आल्या आहेत. दुबई आणि भारतातील किमतीतील तफावत लक्षात घेता, मोठ्या संख्येने प्रवासी त्वरीत प्रवास करून स्वतःसाठी फायदेशीर व्यवसाय बनवू नयेत म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे भारतात काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या हितावर परिणाम होईल.

दिवाळीपूर्वी SBI ने केला मोठा धमाका, आता फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज
दुसरीकडे, जरी तुम्ही कर भरण्यास तयार असाल तरी लक्षात ठेवा की कोणताही प्रवासी परदेशातून जास्तीत जास्त १ किलो सोने आणू शकतो, ज्यामध्ये सोने आणि सोन्याचे दागिने दोन्हींचा समावेश आहे.

दरम्यान, दुबईतून सोने खरेदी करणे हा नेहमीच तोट्याचा सौदा असतो असे नाही, जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त काळ देशाबाहेर राहात असाल तर तुमच्यासाठी शुल्क मुक्त मर्यादा आहे. एक पुरुष प्रवासी ५० हजारांपेक्षा जास्त नसलेले २० ग्रॅम सोन्याचे दागिने आणू शकतो आणि महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंतचे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत एक लाखापेक्षा जास्त नाही, ड्यूटी फ्री मार्गाने देशात आणू शकते.
लेखकाबद्दल
प्रियांका वर्तक
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख