अ‍ॅपशहर

PM मोदींसोबत भेट; पण चर्चा मात्र राकेश झुनझुनवालांच्या शर्टची, वाचा 'बिग बुल' यांचा तो किस्सा

Rakesh Jhunjhunwala Death: भारताचे 'वॉरेन बफेट' म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज सकाळी वयाच्या ६२व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2022, 11:43 am
मुंबईः भारतीय शेअर बाजारात बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते अखेर आज सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळं त्यांचं कौतुकही झालं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakesh jhunjhunwala death


अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झुनझुनवाला यांच्या शर्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. तसंच, मिम्सही व्हायरल झाले होत. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी आलेल्या झुनझुनवाला यांनी चुरगळलेला शर्ट घातला होता. देशाच्या सर्वोच्च पदावर असेलल्या व्यक्तीच्या भेटीसाठी जाताना पण साधेपणाने वावरत असलेल्या झुनझुनवाला यांचे सर्वत्र कौतुक होतं होते. सोशल मीडियावरही त्यांच्या या साधेपणाचे कौतुक झाले होते.

वाचाः टाटाने 'बिग बुल' बनवलं नंतर त्यांनाच टक्कर देत उभारली 'अकासा एयर'; झुनझुनवालांचा थक्क करणारा प्रवास

राकेश झुनझुनवाला यांना मोदींसोबतच्या भेटीदरम्यान असा शर्ट का घातला असा प्रश्न विचारला असता त्यांनी लगेचच उत्तर दिलं होतं. मी घरातून निघताना शर्ट इस्त्री केलं होतं. त्यांनतरही ते चुरगळले त्याला मी काय करणार. ते शर्टच तसं होतं, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच,मला या सगळ्याचा फरक पडत नाही. मला कुठे तिथे क्लाइंट किंवा ग्राहकाला भेटायला जायचंय, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं होतं.

वाचाः पाच हजारांपासून सुरुवात अन् आज कोट्यवधींचा व्यवसाय; राकेश झुनझुनवाला 'बिग बुल' कसे ठरले!

टाटाला टक्कर दिली होती

राकेश झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक क्षेत्रात उतरून टाटा समूहाला आव्हान दिले हते. त्यांनी अकासा एअरलाइन ही कंपनी सुरु केली आहे. अलीकडेच यांच्या क्रूसाठी युनिफॉर्म लाँच करण्यात आला आहे. आकासा एअरचे उद्दिष्ट परवडणारी विमानसेवा प्रदान करण्याचे आहे. राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत सुमारे $५० दशलक्ष डॉलर इतकी मोठी गुंतवणूक आहे. म्हणजेच टाटा समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूकीतून पैसा कमावणाऱ्या झुनझुनवाला यांनी टाटांसोबत टक्कर देण्याची पूर्ण तयारी केली होती. टाटा समूहाने नुकतीच एअर इंडिया विकत घेतली आहे. याशिवाय एअर एशिया आणि विस्तारा सारख्या विमान कंपन्याही टाटा समूहाकडे आहेत.

वाचाः Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला!

महत्वाचे लेख