अ‍ॅपशहर

Property Sale Down घरे विक्रीला करोनाने घरघर; सातही प्रमुख शहरांतील नव्या घर खरेदीला ब्रेक!

करोना संकट, टाळेबंदी, बेरोजगारी याचा थेट फटका स्थावर मालमत्ता क्षेत्राला बसला आहे. आधीच मंदीशी झगडणाऱ्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात लाॅकडाउनमध्ये घरांची विक्री प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2020, 11:11 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशातील सात आघाडीच्या शहरांतील घरविक्री जुलै ते सप्टेंबर या काळात तब्बल ४६ टक्क्यांनी घटली असल्याचे निरीक्षण अॅनारॉक संस्थेने नोंदवले आहे. या सातही शहरांतून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत केवळ २९ हजार ५२० घरे विकली गेली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम देशातील घरविक्री घटली
housing sale


शेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची मोठी झेप
गेल्या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीशी तुलना करता, गेल्यावर्षी दिल्ली राजधानी परिसर (एनसीआर), कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद व पुणे या शहरांतून ५५,०८० घरे विकली गेली होती. यासंदर्भात अॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, घरविक्री गेल्यावर्षीच्या मानाने घटली असली तरी जुलै आधीच्या तिमाहीशी तुलना केल्यास जुलै ते सप्टेंबर या काळात घरविक्री दुप्पट झाली आहे.

सोने चांदी स्वस्त ; जाणून घ्या आजचा भाव
एप्रिल ते जून या तिमाहीत केवळ १२,७३० घरांची विक्री झाली होती. चालू वर्षातील तिसऱ्या तिमाहीत देशातील घरबांधणी क्षेत्राने एकप्रकारे कमबॅक केल्याचे दिसत आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत ४५,२०० घरे विकली गेली आहेत. मात्र जानेवारी ते सप्टेंबर या काळात घरांच्या विक्रीत ५७ टक्के घसरण दिसून आली आहे. गेल्यावर्षी या काळात २,०२,२०० घरे विकली गेली होती, मात्र यंदा या काळात ८७,४६० घरांची विक्री होऊ शकली आहे.
मुकेश अंबानींची नाॅनस्टाॅप कमाई ; लाॅकडाउनमध्येही प्रत्येक तासाला कमवले ९० कोटीझालेली एकूण घरविक्री ; तिमाहीमध्ये विकलेली घरे
तिमाहीघरांची विक्री
जानेवारी ते मार्च ४५,२००
एप्रिल ते जून१२,७३०
जुलै ते सप्टेंबर२९,५२०

जुलै ते सप्टेंबरमधील घरांची विक्री
शहर२०२०२०१९
दिल्ली एनसीआर५,२००९,८३०
एमएमआर९,२००१७,१८०
बेंगळुरू५,४००१०,५००
पुणे४,८५०८,५५०
हैदराबाद १,६५० ३,२८०
चेन्नई१,६००२,६२०
कोलकाता १,६२० ३,१२०

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज