अ‍ॅपशहर

प्रत्येक भारतीय ५ लाख कमावेल; झुनझुनवालांनी पंतप्रधान मोदींना सांगितला होता फॉर्म्युला

rakesh jhunjhunwala: गेल्याच वर्षी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इंडिया का टाईम आ गया, असं त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले होते. भारताचं आर्थिक चित्र खूप बदलणार आहे आणि त्याची कल्पनादेखील कोणी केली नसेल, असं झुनझुनवाला यांनी म्हटलं होतं.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2022, 2:51 pm
मुंबई: भारताचे वॉरन बफेट अशी ओळख असणारे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झालं. केवळ ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू केलं. शेअर बाजाराच्या अभ्यासाच्या जोरावर झुनझुनवाला कोट्यधीश झाले. गेल्याच वर्षी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इंडिया का टाईम आ गया, असं त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले होते. भारताचं आर्थिक चित्र खूप बदलणार आहे आणि त्याची कल्पनादेखील कोणी केली नसेल, असं झुनझुनवाला यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakesh
राकेश झुनझुनवाला पंतप्रधान मोदींसमवेत


दूरदृष्टी असलेलं व्यक्तीमत्त्व, भारताच्या भवितव्याची स्वप्नं असलेला कोट्यधीश गुंतवणूकदार अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी झुनझुनवाला यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या भेटीत झुनझुनवाला यांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं. २०३० पर्यंत प्रत्येक भारतीयाचं उत्पन्न ६ हजार डॉलरच्या पुढे जाऊ शकतं, असं त्यावेळी झुनझुनवाला म्हणाले होते.
महिला, मृत्यू आणि मार्केट.....; राकेश झुनझुनवाला यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेली भविष्यवाणी ठरली खरी
भारतानं समाजवादाच्या विचारसरणीनं आपला प्रवास सुरू केला. आता व्यवहारिक आर्थिक धोरणांनी देश पुढे जात आहे. यामुळे आर्थिक विकास दर वाढेल. त्यामुळे सामाजिक कल्याणात सुधारणा होईल, असं झुनझुनवाला यांनी म्हटलं होतं.

शेअर ट्रेडर ते गुंतवणूकदार असा यशस्वी प्रवास झुनझुनवाला यांनी केला. गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या जागी एका आयोगाची स्थापना करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला होता. या आयोगामध्ये कुशल नोकरशाह, प्रसिद्ध उद्योगपती आणि शेअर बाजारातील दिग्गजांचा समावेश असावा. कृषी उत्पादकता वाढवायला हवी आणि त्या उत्पादनांच्या निर्यातीच्या दिशेनं काम करायला हवं, असं झुनझुनवाला म्हणाले होते.
PM मोदींसोबत भेट; पण चर्चा मात्र राकेश झुनझुनवालांच्या शर्टची, वाचा 'बिग बुल' यांचा तो किस्सा
शेअर बाजाराचे बिग बुल अशी राकेश झुनझुनवाला यांची ओळख होती. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडीमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वडील आयकर अधिकारी होते. राकेश झुनझुनवाला यांच्या मागे पत्नी आणि ३ मुलं असा परिवार आहे. साठी ओलाडल्यानंतर त्यांनी अकासा एअरलाईन्स सुरू केली. काही दिवसांपूर्वीच एअरलाईन्सचं लॉन्चिंग झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख