मुंबईः सर्वसामान्य नागरिक व छोटे व्यावसायिक यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेने सोमवारी एटीएम व चालू खात्यातून दरदिवशी रक्कम काढण्यावरील मर्यादा हटवली. मात्र बँक बचत खात्यातून दर आठवड्याला पैसे काढण्याची २४ हजार रुपयांची मर्यादा यापुढेही सुरू ठेवण्यात आली आहे. हा बदल १ फेब्रुवारीपासून (बुधवार) लागू होणार आहे. येत्या काळात दर आठवड्याला पैसे काढण्याच्या मर्यादेचा लवकरच पुनर्विचार केला जाईल, असे आश्वासन रिझर्व्ह बँकेने दिले आहे. नोटाबंदीनंतर आता सुरू झालेल्या चलनीकरणाचा वेग कसा राहतो त्यावर हा निर्णय अवलंबून राहील, असेही बँकेने सांगितले आहे.
‘एटीएम मर्यादा’ उद्यापासून रद्द
सर्वसामान्य नागरिक व छोटे व्यावसायिक यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेने सोमवारी एटीएम व चालू खात्यातून दरदिवशी रक्कम काढण्यावरील मर्यादा हटवली. मात्र बँक बचत खात्यातून दर आठवड्याला पैसे काढण्याची २४ हजार रुपयांची मर्यादा यापुढेही सुरू ठेवण्यात आहे.
Maharashtra Times 31 Jan 2017, 3:53 am