अ‍ॅपशहर

RBI ने दिली आनंदाची बातमी, 'या' नामांकित बँकेवरचे निर्बंध हटवले....

RBI: गेल्या वर्षी UCO बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यासारख्या अनेक बँका देखील RBI च्या PCA फ्रेमवर्कमधून बाहेर आल्या. जून २०२२ ला संपलेल्या तिमाहीत सेंट्रल बँकेच्या निव्वळ नफ्यात १४.२० टक्के वाढ झाली आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2022, 6:32 pm
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँकेला PCA फ्रेमवर्क म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्कमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता बँकेवरील अनेक निर्बंध हटणार आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2017 पासून सेंट्रल बँक पीसीएच्या यादीत होती. खराब आर्थिक कामगिरीमुळे बँकेला RBI ने PCA फ्रेमवर्कमध्ये ठेवले होते. बँकेच्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (NPAs) मध्ये वाढ झाली आहे आणि मालमत्तेवर टर्न ऑन (ROA) घट झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Central Bank Of India


यापूर्वी इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक आणि आयडीबीआय बँक यांचाही या यादीत समावेश होता, मात्र नंतर या सर्व बँका या यादीतून बाहेर पडल्या. अशा परिस्थितीत पीसीए फ्रेमवर्कमध्ये फक्त सेंट्रल बँक (Central Bank Of India) उरली होती. यासोबतच या सर्व नियमांचे पालन करण्याचे लेखी आश्वासनही सेंट्रल बँकेने दिले आहे. अशा परिस्थितीत RBI ने PCA फ्रेमवर्कच्या यादीतून बँकेला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

OLA कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत, इतक्या कर्मचाऱ्यांना पाठवली नोटीस

आरबीआयने पुनरावलोकनानंतर निर्णय घेतला

या संदर्भात माहिती देताना रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या गेल्या काही वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात RBI ने सुचवलेल्या सर्व नियमांचे केंद्रीय बँकेने योग्य प्रकारे पालन केल्याचे RBI ला आढळून आले आहे. यासोबतच या सर्व नियमांचे पालन करण्याचे लेखी आश्वासनही सेंट्रल बँकेने दिले आहे. अशा परिस्थितीत RBI ने PCA फ्रेमवर्कच्या यादीतून बँकेला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, खात्यात जमा होणार ५० हजार रुपये; ही बॅंक देतेय

सेंट्रल बँकेच्या नोंदीत केलेल्या सुधारणा

गेल्या वर्षी युको (UCO) बँक, इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) आणि आयडीबीआय बँक(IDBI Bank) सारख्या अनेक बँका देखील RBI च्या PCA फ्रेमवर्कमधून बाहेर आल्या आहेत. जून २०२२ ला संपलेल्या तिमाहीत सेंट्रल बँकेच्या निव्वळ नफ्यात १४.२० टक्क्याने वाढ झाली आहे. बँकेचा निव्वळ नफा २३४ कोटींहून अधिक झाला आहे. गेल्या वर्षाबद्दल बोलायचे तर, जूनच्या तिमाहीपर्यंत बँकेचा नफा २०५ कोटी रुपये होता. सेंट्रल बँकेने आरबीआयला एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये गेल्या ५ तिमाहीत बँकेच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले होते.

मुकेश अंबानींनी केरळच्या गुरुवायूर मंदिरात केली पूजा, दिले आतापर्यंतचे सर्वात मोठे

बँकांना पीसीए फ्रेमवर्कमध्ये का ठेवले जाते?

जेव्हा बँकेची आर्थिक स्थिती बिघडू लागते तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक बँकांना PCA फ्रेमवर्कच्या कक्षेत ठेवते. एनपीए वाढणे, भांडवल कमी होणे आणिरिटर्न ऑफ ॲसेट यामुळे बँकांना पीसीए फ्रेमवर्कच्या कक्षेत ठेवले जाते. पीसीए फ्रेमवर्कच्या यादीत नाव समाविष्ट करण्यावर विविध निर्बंध लादले आहेत. यामध्ये नवीन शाखा उघडणे, व्यवस्थापनाला पेन्शन भत्ते अशा अनेक महत्त्वाच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या गुंतवणूकदारांनाही त्यांची भांडवली गुंतवणूक वाढवण्यास सांगितले जाते. आरबीआय PCA फ्रेमवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवते आणि तिची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच बँकेला PCA फ्रेमवर्कमधून बाहेर काढले जाते.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख