अ‍ॅपशहर

रत्नाकर बँक सुरक्षित

येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर अनेक बँकांविषयी अफवा बाजारात पसरत आहेत. त्यापैकी रत्नाकर बँक ऊर्फ आरबीएल बँकेविषयीही, ही बँक संकटात सापडल्याचे वृत्त पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, आरबीएल सक्षम असून तिचे प्रशासन उत्तम प्रकारे काम करत असल्याचे स्पष्टीकरण आरबीएलने मंगळवारी दिले.

Maharashtra Times 18 Mar 2020, 4:43 am
नवी दिल्लीः येस बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर अनेक बँकांविषयी अफवा बाजारात पसरत आहेत. त्यापैकी रत्नाकर बँक ऊर्फ आरबीएल बँकेविषयीही, ही बँक संकटात सापडल्याचे वृत्त पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, आरबीएल सक्षम असून तिचे प्रशासन उत्तम प्रकारे काम करत असल्याचे स्पष्टीकरण आरबीएलने मंगळवारी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम RBL-Bank


बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेच्या आर्थिक स्थैर्याबाबत बाजारात उठलेल्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत. बँक संकटात असल्याचे वृत्त खोडसाळपणे पसरवले जात आहे. बँकेच्या मत्तेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असून यात कोणताही विपरित बदल झालेला नाही. बँक नफ्यात आहे आणि तिचे प्रशासन उत्तम दर्जाचे आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.०८ टक्के आहे. बँकेच्या भागधारकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरबीएलच्या संचालक मंडळाने केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज