अ‍ॅपशहर

रुपया ४७ पैशांनी सावरला

भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गुरुवारी ४७ पैशांनी वधारला. भांडवल बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा झाले. त्यामुळेही भारतीय रुपया सावरण्यास मदत मिळाली आहे.

Maharashtra Times 18 Mar 2016, 3:13 am
परदेशी गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे प्रतीक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम re improves against dollar by 47 paise
रुपया ४७ पैशांनी सावरला


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गुरुवारी ४७ पैशांनी वधारला. भांडवल बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा झाले. त्यामुळेही भारतीय रुपया सावरण्यास मदत मिळाली आहे. चलन बाजारात दिवसअखेर रुपया वधारत बुधवारच्या ६७.३६ या किमतीच्या तुलनेत ६६.७५ या किमतीवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी भारतीय रुपयाचा डॉलरसाठी विनिमय दर ६६.८८ इतका निश्चित केला.

अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडने दरवाढ करणे पुढे ढकलल्यामुळे बँका व निर्यातदार यांनी मोठ्या प्रमाणावर डॉलरविक्री सुरू ठेवली आहे. ही स्थिती रुपयाच्या पथ्यावर पडली आहे. केंद्र सरकारकडून भारतीय अर्थव्यवस्था रुळांवर येण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येण्यास सुरुवात झाल्याचे हे प्रतीक आहे, असे मत परकीय चलन वितरक व्यक्त करत आहेत. रुपया यापूर्वी ८ जानेवारी रोजी ६६.६३ या स्तरापर्यंत आला होता. त्यानंतर गुरुवारी प्रथमच रुपया वधारला.

फेडच्या निर्णयाचा परिणाम

यूएस फेडकडून दोन किंवा चार टक्के व्याजदरवाढ होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याने सर्वांची निराशा झाली. त्यामुळे अमेरिकी डॉलरची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. परिणामी, आशियाई चलन बाजारांतही डॉलरचा प्रभाव क्षीण दिसून आला. विशेषतः जपानी येनच्या तुलनेतही डॉलर तितकासा सक्षम होऊ शकला नाही.

अन्य चलने महागच

डॉलरच्या तुलनेत रुपया सक्षम झाला असला तरी तो अन्य चलनांच्या तुलनेत अशक्तच राहिला. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार अमेरिकी डॉलरसाठी गुरुवारी ६६.८८ रुपये मोजावे लागले. मात्र एका युरोसाठी १.१० रुपये, १.०३ रुपये तर ०.७३ रुपये अधिक मोजावे लागले. त्यामुळे एका युरोची किंमत ७५.४९ रुपये, एका पौंडची किंमत ९५.७६ रुपये तर एका येनची किंमत ५९.९७ रुपये राहिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज