अ‍ॅपशहर

रिलायन्स डिफेन्सला १५ परवाने

नवी दिल्ली ः रिलायन्स डिफेन्स या खासगी कंपनीला ध्वनिपटाचे (स्पेक्ट्रम) १५ परवाने मिळाले आहेत. यापूर्वी कंपनीकडे १० परवाने होते, त्यामुळे आता सर्वाधिक स्पेक्ट्रम परवाने मिळवणारी रिलायन्स डिफेन्स ही कंपनी झाली आहे.

Maharashtra Times 3 May 2016, 1:34 am
नवी दिल्ली: रिलायन्स डिफेन्स या खासगी कंपनीला ध्वनिपटाचे (स्पेक्ट्रम) १५ परवाने मिळाले आहेत. यापूर्वी कंपनीकडे १० परवाने होते, त्यामुळे आता सर्वाधिक स्पेक्ट्रम परवाने मिळवणारी रिलायन्स डिफेन्स ही कंपनी झाली आहे. ही कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची घटक कंपनी आहे. या परवान्यांमुळे कंपनीला विविध प्रकारच्या तांत्रिक सेवा देणे शक्य होणार आहे. यामध्ये अवजड शस्त्रे, सैन्यासाठी लागणारी वाहने, दारुगोळा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम आदी सेवांचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reliance defence gets 15 spectrum licences
रिलायन्स डिफेन्सला १५ परवाने


रिलायन्स ही संरक्षण क्षेत्रत उतरलेली नवी कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीला टाटा, एलअँडटी, बाबा कल्याणी समूह, महिंद्र अशा बड्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. पुढील १० ते १५ वर्षांत संरक्षणविषयक ५० हजार कोटी रुपयांचे करार रिलायन्सबरोबर होतील, असा विश्वास कंपनीने दाखवला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज