अ‍ॅपशहर

अदानी-अंबानी आमने-सामने! किशोर बियाणीची कंपनी खरेदीसाठी चुरस, ११ इतरही अंतिम टप्प्यात

Future Retail News: कर्जबाजारी किशोर बियाणी यांची कंपनी, फ्युचर रिटेल, विकली जाणार असून यासाठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह ११ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. फ्युचर रिटेलमध्ये बिग बाजार, फूडहॉल आणि इझी डे सारखे स्टोअर ब्रँड आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2022, 1:42 pm

हायलाइट्स:

  • किशोर बियाणी यांची कंपनी फ्युचर रिटेल विकली जाणार आहे
  • गौतम अदानी आणि मुकेश अंबानीसह ११ कंपन्या शर्यतीत
  • कंपनीचे बिग बाजार, फूडहॉल आणि इझी डे सारखे ब्रँड आहेत.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mukesh Ambani Vs Gautam Adani for Future Retail
नवी दिल्ली: रिलायन्स रिटेल, अदानी समूहाचा संयुक्त उपक्रम एप्रिल मून रिटेल आणि इतर ११ कंपन्या कर्जबाजारी फ्यूचर रिटेल खरेदी करण्यासाठी संभाव्य बोलीदारांच्या अंतिम यादीत असल्याचे दिसत आहेत. फ्युचर रिटेल लिमिटेड फ्युचर रिटेलच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या कंपन्यांना संबंधित भागधारकांकडून एनओसी मिळाल्यानंतर संभाव्य रिझोल्यूशन अर्जदारांच्या अंतिम यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
रिलायन्स रिटेल आणि एप्रिल मून रिटेल व्यतिरिक्त, बोलीदारांमध्ये कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज, धर्मपाल सत्यपाल, नलवा स्टील अँड पॉवर, शालीमार कॉर्प, एसएनव्हीके हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट, युनायटेड बायोटेक आणि डब्ल्यूएच स्मिथ ट्रॅव्हल यांचा समावेश आहे. नवीन माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२२ रोजी संभाव्य रिझोल्यूशन अर्जदारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत. ३ नोव्हेंबर ही संभाव्य खरेदीदारांद्वारे स्वारस्य व्यक्त करण्याची अंतिम तारीख होती.

फ्युचर रिटेल 'कंगाल'; NCLT ने सुरु केली दिवाळखोरीची प्रक्रिया
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी, देशातील दोन मोठे उद्योगपती आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करत आहेत, त्यामुळेच त्यांनी किशोर बियाणी यांची कंपनी, फ्युचर रिटेल खरेदी करण्यात रस दाखवला आहे. कंपनी दिवाळखोरीच्या ठरावातून जात आहे.

Kishore Biyani किशोर बियाणींना तडाखा ; रिलायन्ससोबतचे प्रकरण बियाणींना भोवणार, दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आदेश
रिलायन्स आणि फ्युचरमधील करार
फ्युचर रिटेलच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने सांगितले की संभाव्य बोलीदारांची यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर, संकल्प योजना १५ डिसेंबरपर्यंत सादर करावी लागेल, जी बंधनकारक असेल. फ्युचर रिटेलमध्ये बिग बाजार, फूडहॉल आणि इझी डे सारखे स्टोअर ब्रँड आहेत. सध्या कंपनी देशात सुमारे ३०० स्टोअर्स सुरु आहेत, ज्यामध्ये ३० मोठ्या फॉरमॅट आणि २७२ लहान फॉरमॅट स्टोअर्सचा समावेश आहे. मात्र, अलीकडच्या काळात या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

अंबानींची नवी खेळी; तीन कोटी व्यावसायिकांपर्यंत पोहचण्यासाठी थेट 'या' कंपनीला आॅफर
ऑगस्ट २०२० मध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने फ्युचर ग्रुपचा किरकोळ, घाऊक, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग व्यवसाय २४,७१३ कोटी रुपयांत विकत घेण्यासाठी करार केला, पण अमेरिकेतील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने या कराराला विरोध केला. या वर्षी एप्रिलमध्ये रिलायन्सने या करारातून माघार घेतली होती. कराराची घोषणा झाल्यानंतर रिलायन्सने फ्युचरला त्यांचे कामकाज चालवण्यासाठी काही आर्थिक मदत केली होती. पण फेब्रुवारीमध्ये रिलायन्सने फ्युचर रिटेलची ९५० हून अधिक दुकाने बंद केली. यानंतर रिलायन्सने या ठिकाणी आपले स्टोअर सुरू केले.

महत्वाचे लेख