अ‍ॅपशहर

महागाईचा धोका कायम; किरकोळ बाजारात डाळी स्वस्त तर भाजीपाला, फळे महागली

Retail Inflation Fall in June 2022 : 'एनएसओ'च्या आकडेवारीनुसार भाजीपाल्यामधील महागाईचा दर १७.३७ टक्के नोंदवला गेला आहे. हाच दर मे महिन्यात १८.२६ टक्के होता. डाळी आणि डाळींच्या दरांमध्ये घट नोंदवली गेली

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 13 Jul 2022, 7:54 am

हायलाइट्स:

  • किरकोळ चलनवाढ जून महिन्यात ७.०१ टक्क्यांवर आली.
  • मे महिन्यात ती ७.०४ टक्के नोंदवली गेली होती.
  • जूनमध्ये डाळी आणि डाळींच्या दरांमध्ये घट नोंदवली गेली
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pulses
जून महिन्यात डाळींचे भाव उतरले.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ चलनवाढ जून महिन्यात ७.०१ टक्क्यांवर आली असून, मे महिन्यात ती ७.०४ टक्के नोंदवली गेली होती. धान्य, डाळी, भाज्यांच्या दरात झालेली घट हे किरकोळ महागाई किंचित सुसह्य होण्याचे कारण मानले जात आहे. असे असले, तरी रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाईचा अपेक्षित असलेला दर गाठण्यात किरकोळ चलनवाढीला सलग सहाव्या महिन्यात अपयश आले आहे. त्याचवेळी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मे महिन्यात वाढला आहे.
सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) मंगळवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांतील महागाई जून महिन्यात ७.७५ टक्के इतकी नोंदवली गेली. हाच आकडा मे महिन्यात ७.९७ टक्के इतका होता. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई कमाल सहा टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये दोन टक्के फरक चालू शकतो. पण, गेली सहा महिने किरकोळ महागाई सहा टक्क्यांच्यापुढे राहिली आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूक ; म्युच्युअल फंड मॅनेजरच्याही पसंतीचा निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स
'एनएसओ'च्या आकडेवारीनुसार भाजीपाल्यामधील महागाईचा दर १७.३७ टक्के नोंदवला गेला आहे. हाच दर मे महिन्यात १८.२६ टक्के होता. डाळी आणि डाळींच्या दरांमध्ये घट नोंदवली गेली, तर धान्यांमधील महागाईचा दर ५.६६ टक्क्यांवर गेला. तो गेल्या महिन्यात ५.३३ टक्के इतका होता. 'फ्युएल आणि लाइट' या प्रकारातील महागाई वाढली असून, गेल्या महिन्यातील ९.५४ टक्क्यांवरून ती १०.३९ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. फळांमधील महागाईच्या दरातही वाढ झाली असून, २.३३ टक्क्यांवरून ३.१० टक्क्यांवर ती पोहोचली आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA वाढीवर सर्वात मोठे अपडेट, या दिवशी होईल महागाई भत्ता
महागाईवरील रिझर्व्ह बँकेचे उपाय व मते

- रेपो दरामध्ये ०.५० आणि ०.४० टक्क्यांनी वाढ

- चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या टप्प्यांत परिस्थिती सुधारेल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मत

- चालू आर्थिक वर्षात महागाई ६.७ टक्क्यांवर राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज. आधी हा अंदाज ५.७ टक्के वर्तवण्यात आला होता.

- मान्सून चांगला झाला, तर महागाई कमी होण्याची शक्यता

- इंडोनेशियामधील पामतेलावरील बंदी हटविण्याचा सकारात्मक परिणाम

औद्योगिक उत्पादनात वाढ
नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असून, मे महिन्यात १९.६ टक्क्यांवर पोहोचले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार (आयआयपी) उद्योगक्षेत्राच्या योगदानामध्ये मे महिन्यात २०.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाणकामातील उत्पादनातही वाढ झाली असून, ते १०.९ टक्क्यांवर पोहोचले आहे. ऊर्जानिर्मितीमध्ये २३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे २०२१मध्ये 'आयआयपी' २७.६ टक्के नोंदविले गेले होते. करोनाकाळात औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसला होता. मार्च २०२०मध्ये आयआयपी १८.७ टक्के नोंदवले गेले होते.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज