अ‍ॅपशहर

औद्योगिक उत्पादन घटले, महागाईदरात वाढ

देशातील औद्योगिक उत्पादनवाढीची गती अपेक्षेपेक्षा कमी होत असून किरकोळ महागाई दरात मात्र वाढ होत असल्याची नोंद झाली आहे. फेब्रुवारीत औद्योगिक उत्पादन वाढ नकारात्मक दिशेने जात -१.२ टक्क्यांवर आली. जानेवारी महिन्यात वाढीचा दर होता २.७ टक्के. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे किरकोळ महागाई दरात फेब्रुवारीच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांची वाढ होऊन ३.८१ टक्के इतकी नोंद केली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच किरकोळ महागाई दर ३.६५ टक्के इतका होता.

Maharashtra Times 12 Apr 2017, 11:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम retail inflation jumps to 3 81 in march as against 3 65 in february
औद्योगिक उत्पादन घटले, महागाईदरात वाढ

देशातील औद्योगिक उत्पादनवाढीची गती अपेक्षेपेक्षा कमी होत असून किरकोळ महागाई दरात मात्र वाढ होत असल्याची नोंद झाली आहे. फेब्रुवारीत औद्योगिक उत्पादन वाढ नकारात्मक दिशेने जात -१.२ टक्क्यांवर आली. जानेवारी महिन्यात वाढीचा दर होता २.७ टक्के. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे किरकोळ महागाई दरात फेब्रुवारीच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांची वाढ होऊन ३.८१ टक्के इतकी नोंद केली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच किरकोळ महागाई दर ३.६५ टक्के इतका होता.

औद्योगिक उत्पादन वाढ आणि किरकोळ महागाई दर यांचे आकडे आर्थिक विकास वाढ आणि व्याजदरात घट करण्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे बाजारतज्ञ आणि अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत महागाई कशी कमी करावी याकडेच लक्ष देण्याची गरज असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे म्हणणे असल्याचे आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. महागाई कमी झाल्यानंतरच व्याज दर घटण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मार्च महिन्यात तीव्र गतीने महागाई वाढण्याचे कारण इंधन, वीजेच्या महागाईदरात झालेली वाढ हे आहे. इंधन आणि वीजेचा महागाईदर ३.९ टक्क्यांवरून वाढत तो ५.५६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. मार्चमध्ये कपडे, पादत्राणांच्या महागाईदरातही वाढ नोंदवण्यात आली.

खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. मार्चमध्ये खाद्या महागाई दर होता २.०१ टक्के. यात किंचितशी घट होत तो १.९३ टक्क्यांवर आला. भाजीपाल्यांच्या महागाई दरातही -८.२९ टक्क्यांवरून घट होत तो -७.२४ टक्के इतका झाला आहे. याच्या नेमके उलटे, फळांच्या महागाई दर ८.३३ टक्क्यांवरून वाढून ९.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज