अ‍ॅपशहर

जनधन खात्यातून १० हजारच काढता येणार

केंद्र सरकारने ५००, १००० च्या नोटा बंद केल्यानंतर जनधन खात्यांमध्ये अचानक ७२ हजार कोटींहून अधिक रुपये जमा झालेत. यामुळे आता हा पैसा काढण्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. जनधन खात्यातून महिन्याला फक्त १० हजार रुपयेच काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा घातली आहे.

Maharashtra Times 30 Nov 2016, 10:25 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 10000 withdrawal allowed from jan dhan account in a month
जनधन खात्यातून १० हजारच काढता येणार


केंद्र सरकारने ५००, १००० च्या नोटा बंद केल्यानंतर जनधन खात्यांमध्ये अचानक ७२ हजार कोटींहून अधिक रुपये जमा झालेत. यामुळे आता हा पैसा काढण्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. जनधन खात्यातून महिन्याला फक्त १० हजार रुपयेच काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा घातली आहे. पण काही परिस्थितींमध्ये या खात्यातून मर्यादेपक्षा जास्त रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली आहे.

केवायसीच्या नियमांचे पूर्णपणे पालन करणाऱ्या खातेधारकांना दर महिन्याला आपल्या जनधन खात्यातून १० हजार रुपये काढता येतील. तसंच १० हजारापेक्षा अधिकची रक्कम काढायची असल्यास बँकेच्या व्यवस्थापकांची मंजुरी आवश्यक असेल. तेही संपूर्ण कागदपत्रांची खातरजमा केल्यावर आणि परिस्थितीची माहिती घेतल्यावरच ही मंजुरी मिळू शकणार आहे, असं आरबीआयने बुधवारी जारी केलेल्या आपल्या आदेशात स्पष्ट केलंय.

केवायसी नसलेले जनधन खातेधारक महिन्याला फक्त पाच हजार रुपयेच काढू शकतील. हा नियम ९ नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा केलेल्या रकमेसाठी आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या जनधन खात्यांमध्ये मनी लाँड्रींग करणाऱ्यांचे पैसे जमा होऊ नयेत, या उद्देशाने आरबीआयने हे नवे नियम लागू केले आहेत.

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक रिकाम्या जनधन खात्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पैसे जमा झालेत. यामुळे देशातील जनधन खात्यांमध्ये नोटाबंदीनंतर ७२ हजार कोटींहून अधिक रुपये जमा केले गेलेत. जनधन खात्यांमधील आधीच्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम ६० टक्क्यांहून अधिक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज