अ‍ॅपशहर

LICचे ७ हजार कोटी बुडाले!

सिगारेटवर जीएसटी परिषदेने अधिभार लावल्याने शेअर बाजारात तंबाखू उत्पादन करणाऱ्या आयटीसी कंपनीचे १५ टक्के शेअर गडगडले आहेत. त्यामुळे आयटीसीमध्ये सर्वाधिक शेअर होल्डर असलेल्या एलआयसीला त्याचा फटका बसला आहे. शेअर कोसळल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात एलआयसीला ७ हजार कोटी रूपयांचे नुकसान झालयं.

Maharashtra Times 18 Jul 2017, 1:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 7000 cr gone in 30 mins lic takes biggest hit in itcs free fall
LICचे ७ हजार कोटी बुडाले!


सिगारेटवर जीएसटी परिषदेने अधिभार लावल्याने शेअर बाजारात तंबाखू उत्पादन करणाऱ्या आयटीसी कंपनीचे १५ टक्के शेअर गडगडले आहेत. त्यामुळे आयटीसीमध्ये सर्वाधिक शेअर होल्डर असलेल्या एलआयसीला त्याचा फटका बसला आहे. शेअर कोसळल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात एलआयसीला ७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झालयं.

यापूर्वी १९९२ मध्ये आयटीसीचे शेअर मोठ्याप्रमाणावर कोसळले होते. त्यानंतर आज १५ टक्के शेअर गडगडले. त्यामुळे देशातील जीवन विमा कंपन्यांना १० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले. तर एफपीआय कंपनीला ९ हजार कोटींचं नुकसान सोसावं लागलं. गेल्या चार वर्षापासून एलआयसी आयटीसीमध्ये भागीदारी वाढवत आहे. २०१३ मध्ये एलआयसीचे आयटीसीमध्ये १२.१७ टक्के शेअर होते.

एखाद्या कंपनीचे शेअर घेणे वा त्या कंपनीतील शेअर वाढविणे याचा स्मोकिंगशी संबंध नसतो, असा युक्तिवाद एलआयसीचे चेअरमन व्ही. के. शर्मा यांनी केला होता. सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्या विरोधात एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज