अ‍ॅपशहर

एसबीआयचे कार्डधारक ५० लाखांवर

स्टेट बँकेच्या (एसबीआय) कार्डधारकांमध्ये गेल्या वर्षभरात १० लाखांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

Maharashtra Times 19 Sep 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः स्टेट बँकेच्या (एसबीआय) कार्डधारकांमध्ये गेल्या वर्षभरात १० लाखांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यामुळे बँकेचे कार्डधारक ५० लाखांवर गेले आहेत. ही माहिती एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sbi cardholders
एसबीआयचे कार्डधारक ५० लाखांवर


गेल्या वर्षभरात कार्डच्या साह्याने खर्च करण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रत्येक महिन्यात ३५०० कोटी रुपयांचे व्यवहार कार्डने झाले. यंदा ५५०० कोटी रुपयांचे व्यवहार कार्डने झाले आहेत. कार्डच्या वापरासंदर्भात एसबीआय आता कार्ड उद्योगात चौथ्या क्रमांकाचा मोठा वापरकर्ता ठरली आहे. वार्षिक आधारावर कार्ड व्यवसायाची ४० टक्के वाढ होत आहे. आगामी वर्षात किमान ३० टक्के वाढ टिकून राहील, अशी अपेक्षा एसबीआयने व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज