अ‍ॅपशहर

ब्रोकर शुल्कात सेबीकडून कपात

शेअर व्यवहारांसाठी ब्रोकरकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) घेतला आहे.

Maharashtra Times 15 Jan 2017, 2:08 am
जयपूर: शेअर व्यवहारांसाठी ब्रोकरकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) घेतला आहे. येथे झालेल्या ‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेअर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘सेबी’ने स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sebi lowers broker fees by 25 goes digital on all payments
ब्रोकर शुल्कात सेबीकडून कपात


शेअर व्यवहारांसाठी ब्रोकरकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) घेतला आहे. सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेअर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सेबीने स्पष्ट केले.

पुढील तीन आर्थिक वर्षांतील निर्धारित जमा-खर्चाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सेबीने सांगितले. एक कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर खरेदी-विक्री व्यवहारांत ब्रोकरकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कास हा निर्णय लागू होईल. यानुसार अशा व्यवहारांसाठी आतापर्यंत मिळणाऱ्या २० रुपये शुल्काऐवजी यापुढे १५ रुपये दिले जातील. याशिवाय, संबंधित कंपन्या व ब्रोकरनी शेअर ग्राहकांना करण्यात येणारे परतावे हे प्रामुख्याने डिजिटल माध्यमातून करावेत, अशी सूचनाही सेबीने केली आहे. डिजिटल पद्धतीमुळे झटपट तसेच सुलभ परतावे करता येतील. काही व्यवहारांमध्ये होणारा अनावश्यक विलंब त्यामुळे टळेल. ब्रोकर शुल्क कमी झाल्याचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फायदा होईल आणि शेअर बाजारातील व्यवहारांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास सेबीने व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज