मुंबई : टाटा मोटर्सला तिसऱ्या तिमाहीअखेर झालेल्या २७ हजार कोटी रुपये तोट्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्रीचा मार्ग अवलंबल्याने व्यवहारांच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ४२५ अंकांनी घसरून २६,५४६च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकात (निफ्टी) १२६ अंकाची घसरण होऊन १०,९४३ अंकांवर पोहोचला. टाटा मोटर्सच्या समभागात १७.२८ टक्क्यांची घसरण होऊन तो १५१.३० रुपयांवर बंद झाला.
सेन्सेक्स कोसळला
टाटा मोटर्सला तिसऱ्या तिमाहीअखेर झालेल्या २७ हजार कोटी रुपये तोट्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्रीचा मार्ग अवलंबल्याने व्यवहारांच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.
30 9 Feb 2019, 4:00 am