अ‍ॅपशहर

सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री नोंदविल्याने बुधवारी सत्रांतर्गत व्यवहारांच्या अखेरीस दोन्ही शेअर बाजारांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

Maharashtra Times 19 Jul 2018, 12:30 am
वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sensex falls 146 points nifty ends below 11000
सेन्सेक्स, निफ्टीत घसरण


समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री नोंदविल्याने बुधवारी सत्रांतर्गत व्यवहारांच्या अखेरीस दोन्ही शेअर बाजारांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) १४६ अंकानी घसरून ३६,३७३च्या पातळीवर पोहोचला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २७ अंकांनी घसरून १०,८९०च्या पातळीवर स्थिरावला. वेदांता लिमिटेड आणि टाटा स्टीलच्या शेअरची सर्वाधिक विक्री झाल्याचे दिसून आले. वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये २.७४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात येऊन तो २०४.४०च्या पातळीवर बंद झाला. ५.३५ टक्क्यांच्या घसरणीसह टाटा मोटर्सचा शेअर ५०४च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत अनुक्रमे १.०५ टक्के आणि १.११ टक्के घसरण नोंदविण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज