अ‍ॅपशहर

चौफेर खरेदी; सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला

दिल्ली निवडणुकीचे निकाल आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी आज गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. चौफेर खरेदीने मंगळवारी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२५ अंकांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 10:12 am
मुंबई : दिल्ली निवडणुकीचे निकाल आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी आज गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. चौफेर खरेदीने मंगळवारी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२५ अंकांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीएसई


थकीत कर्जांचा बोजा ७.१७ लाख कोटींवर
आज सकाळीच आशियातील इतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सिंगापूरचा शेअर बाजार ४४ अंकांनी वधारला. तसेच आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात तेजी आहे. अजूनही बड्या कोर्पोरेट्सचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. आज कोल इंडिया आणि भेल या दोन सार्वजनिक कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, डीमार्टची प्रमुख कंपनी असलेल्या अव्हेन्यू सुपर मार्केट्सच्या शेअरने सोमवारी १.५ लाख कोटींचा बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला. काल अव्हेन्यू सुपर मार्केट्सचा शेअर ८ टक्क्यांनी वधारला होता.

सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सला येणार अच्छे दिन

आज आयटी, पाॅवर, टेक, वित्त सेवा, बांधकाम, इन्फ्रा, तेल आणि वायू, बँकेक्स, आॅटो या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भरती एअरटेल, टाटा स्टील, एलअँडटी, एचयूएल, नेस्ले, टायटन, टीसीएस हे शेअर वधारले आहेत. करोना विषाणूंच्या संसर्गामुळे रविवारी चीनमध्ये एक दिवसात आणखी ९७ जणांचा बळी गेला असून, या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४० हजार जणांना या विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे चीनच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज