अ‍ॅपशहर

शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स १०० अंशांनी आपटला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात घसरण दिसून आली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०७ अशांनी घसरला. यामुळे निर्देशांक ४०, २१५ वर उघडला. निफ्टीमध्ये २५ अशांची घसरण होत निर्देशांक ११, ८८३ पर्यंत खाली आला. शेअर बाजार सुरुवातीला घसरला असला तरी नंतर सावरला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2019, 5:13 pm
नवी दिल्लीः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात घसरण दिसून आली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०७ अशांनी घसरला. यामुळे निर्देशांक ४०, २१५ वर उघडला. निफ्टीमध्ये २५ अशांची घसरण होत निर्देशांक ११, ८८३ पर्यंत खाली आला. शेअर बाजार सुरुवातीला घसरला असला तरी नंतर सावरला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम share market


मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये यश बँक, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांच्या शेअर्सचे भाव वधारले होते. एमटीएनलच्या शेअर्सचे भाव ५ टक्क्यांनी वधारलेत. तर सन फार्मा कंपनीच्या शेअर्सच्या भावात घसरण कायम आहे. निफ्टीतही सन फार्मासोबत सिपला कंपनीचे शेअर्सचे दर घसरले. छोट्या आणि मध्यम दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची वाढ दिसली.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे शेअर बाजारांमध्ये अजूनही अस्थिरता आहे. दुसरीकडे हॉंगकाँगमध्ये हिंसा उसळल्याने त्याचेही परिणाम आशियाई शेअर बाजारांवर दिसत आहेत.

भारतीयांची स्विस खाती बेवारस, पैसा कुणाचा?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज