अ‍ॅपशहर

सेन्सेक्स उसळला

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत चाललेला भांडवल बाजार मंगळवारी अचानक उसळला आणि सर्वत्र आशादायी चित्र निर्माण झाले.

Maharashtra Times 28 Dec 2016, 3:00 am
मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत चाललेला भांडवल बाजार मंगळवारी अचानक उसळला आणि सर्वत्र आशादायी चित्र निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०६ अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२४ अंकांनी वर गेला. सोन्याच्या भावातही वाढ दिसून आली, मात्र रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ३२ पैसे गडगडला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sensex up
सेन्सेक्स उसळला


केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर कमी हवेत असे केलेले विधान तसेच दीर्घकालीन भांडवली लाभांवर कर आकारणी होणार नसल्याचे केलेले सूतोवाच भांडवल बाजाराच्या पथ्यावर पडले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ८ डिसेंबरनंतर प्रथमच सेन्सेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर उसळला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज