अ‍ॅपशहर

हिरे कारागिरांनी गमावले रोजगार

अमेरिका व चीनमधील व्यापारसंघर्षाची भारतीय हिरे व्यापारक्षेत्रास मोठी झळ बसली आहे. चीन आणि पश्चिम आशियाई देशांमधील हिऱ्यांची मागणी घटल्याने गुजरातमधील हिरे व्यवसायातील १० ते १५ टक्के कारागिरांना रोजगार गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 22 Aug 2019, 1:00 am
ईटी वृत्त, नवी दिल्लीः अमेरिका व चीनमधील व्यापारसंघर्षाची भारतीय हिरे व्यापारक्षेत्रास मोठी झळ बसली आहे. चीन आणि पश्चिम आशियाई देशांमधील हिऱ्यांची मागणी घटल्याने गुजरातमधील हिरे व्यवसायातील १० ते १५ टक्के कारागिरांना रोजगार गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DIOMAND


हिऱ्यांना पैलू पाडणे व त्यांना पॉलिश करण्याच्या व्यवसायात गुजरात आघाडीवर आहे. अमेरिका-चीन व्यापारसंघर्षामुळे सूरत, अमरेली, भावनगर येथील हा व्यवसाय थंडावला आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत या व्यवसायातील १० ते १५ टक्के कारागिरांनी रोजगार गमावले आहेत. अमेरिका व युरोपमधील हिरेमागणी स्थिर आहे. परंतु आखाती देशांतील बाजारांनी हात आखडता घेतला आहे. तसेच, मोठी बाजारपेठ असणाऱ्या चीनच्या मागणीत १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट कौन्सिलचे उपाध्यक्ष कॉलिन शहा यांनी दिली.

गेल्या चार महिन्यांत पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किमती सहा ते दहा टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज