अ‍ॅपशहर

विजय मल्ल्यांना विचारणा

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी ४० दशलक्ष डॉलर मुलांच्या नावे देशाबाहेर पाठवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी मल्ल्यांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

Maharashtra Times 10 Mar 2017, 12:37 am
नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी ४० दशलक्ष डॉलर मुलांच्या नावे देशाबाहेर पाठवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी मल्ल्यांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मुलांच्या नावे देशाबाहेर इतकी मोठी रक्कम पाठवल्याप्रकरणी मल्ल्यांनी यांनी दिलेल्या कारणांच्या सत्यतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supreme court asks vijay mallya whether he truthfully disclosed assets
विजय मल्ल्यांना विचारणा


न्यायाधीश आदर्श कुमार गोयल व यू. यू. ललित यांनी मल्ल्यांचे वकिल सी. एस. वैद्यनाथन यांना प्रश्न विचारले. मल्ल्यांनी देशाबाहेर नेलेली ही रक्कम बँकांकडे जमा करावी, यासाठी न्यायालयात बँकांच्या गटाने सादर केलेल्या दोन्ही याचिकांवरील निकाल यावेळी न्यायालयाने राखून ठेवला. पीठाने यावेळी विचारले की, मल्ल्या यांनी त्यांची मत्ता खरोखरच जाहीर केली आहे काय? कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून ४० दशलक्ष डॉलर देशाबाहेर नेले नाहीत काय? असा सवालही या पीठाने मल्ल्यांच्या वकिलांना केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज