अ‍ॅपशहर

टीसीएसचे नवे अध्यक्ष गोपीनाथन

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) राजेश गोपीनाथन यांची नेमणूक कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालकपदी केली आहे.

Maharashtra Times 13 Jan 2017, 3:00 am
मुंबई ः टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) राजेश गोपीनाथन यांची नेमणूक कंपनीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालकपदी केली आहे. टीसीएसचे विद्यमान सीईओ एन. चंद्रशेखरन यांची निवड टाटा समूहाच्या अध्यक्षपदी गुरूवारी करण्यात आल्यामुळे टीसीएसने नव्या सीईओंची घोषणा केली आहे. टीसीएस फायनान्शियल सर्व्हिसेसचे विद्यमान अध्यक्ष एन. गणपती सुब्रमणियम यांची नेमणूक आता टीसीएसचे अध्यक्ष व मुख्य कामकाज अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tcs
टीसीएसचे नवे अध्यक्ष गोपीनाथन


‘टीसीएसची ताकद तिच्या नेतृत्वात सामावलेली आहे. माझ्यानंतर नवे नेतृत्व टीसीएसची दमदार वाटचाल अशीच पुढे सुरू ठेवेल’, असा विश्वास एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज