अ‍ॅपशहर

... म्हणून एलन मस्क विकणार स्वतःची घरं

गेल्या काही दिवसांपासून सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलन मस्क त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत आहेत. त्यांनी आता स्वतःची घरं विकण्याचाच निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी त्यांच्या एका ट्वीटमुळे टेस्ला कंपनीला कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं होतं. आता घरं विकण्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2020, 4:46 pm
नवी दिल्ली : आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत राहणारे इलेक्ट्रिक कार मेकर दिग्गज कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एलन मस्क हे जगातील २२ वे श्रीमंत व्यक्ती आहेत. आपली सर्व घरं विकणार असल्याचा संकल्प त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसात केलेल्या ट्वीट्समधून त्यांनी हे सांगितलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tesla ceo elon musk homes for sale after vow to sell
... म्हणून एलन मस्क विकणार स्वतःची घरं


काय आहे कारण?

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, कॉमिडिन जो रोगनसोबत साधलेल्या संवादात एलन मस्क यांनी त्यांच्या या संकल्पासह इतर अनेक गोष्टीही शेअर केल्या आहेत. द जो रोगन एक्सपीरियन्स पॉडकास्टमध्ये त्यांनी हे सर्व सांगितलं. ते म्हणाले, 'संपत्ती अशी गोष्ट आहे ज्यामुळे समाजात तुमची मान खाली जाते. तुम्हाला माहित असेल, हीच गोष्ट तुमच्यावर हल्ला होण्यासाठी कारणीभूत ठरते. लोक म्हणतात, मिस्टर अब्जाधीश, तुम्हाला या सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. पण आता माझ्याकडे काहीही नाही. आता तुम्ही काय करणार?'

अबब! एका महिन्यात कमावले ९५ हजार कोटी रुपये

एलन मस्क हे स्पेस एक्सचेही सीईओ आहेत. ४८ वर्षीय मस्क यांनी रविवारी कॅलिफोर्नियामधील आपली दोन घरं विकण्याचं जाहीर केलं. या घरांची किंमत ३.९५ कोटी डॉलर म्हणजेच २९७ कोटी रुपये एवढी आहे.

एलन मस्क यांनी १ मे रोजीही ट्वीट केलं होतं, ज्यात सांगितलं होतं की सर्व घरं विकणार आहे. टेस्लाच्या शेअर्सचं मूल्य अधिक आहे, असंही ते म्हणाले होते. मस्क यांच्या या ट्वीटनंतर टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती, ज्यामुळे कंपनीला कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं.
अजबच! एलन मस्कच्या बाळाचे नाव X Æ A-12
मस्क यांनी जी दोन घरं विकण्याचा निर्णय जाहीर केला, त्यातील एक घर हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जिन वाइल्डर यांच्याकडून २०१३ मध्ये खरेदी केलं होतं. या घराची किंमत ७५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसऱ्या घराची किंमत २२५ कोटी रुपये आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज