नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे लवकरच शंभर रुपयाची नवी नोट चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने याविषयी एक अधिसूचना काढली असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. महात्मा गांधी सीरिजमधील ही नवी नोट जांभळ्या रंगाची आहे. तिच्या मागील बाजूस स्वच्छ भारत मोहिमेच्या बोधचिन्हासह रानीकी बाँव या गुजरातमधील प्रसिद्ध पुरातन वास्तूचे चित्र छापण्यात आले आहे. या नोटांचे वितरण टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
शंभर रुपयांची नवी नोट लवकरच
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे लवकरच शंभर रुपयाची नवी नोट चलनात येणार आहे...
Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am