मुंबई ः आशियाई चलने सक्षम झाल्याचा परिणाम म्हणून भारतीय रुपयाही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गुरुवारी सावरला. रुपया ६२ पैसे वधारल्यामुळे एका अमेरिकी डॉलरसाठी ७६.०६ रुपये मोजावे लागले. ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या माध्यमातून आणखी सरकारी रोखे खरेदी करण्याचा मानस रिझर्व्ह बँकेने गुरुवारी व्यक्त केला. त्यामुळे भारतीय चलनावरील विश्वास वाढल्याचे विदेश चलन व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँक २७ तारखेला एका सरकारी रोख्यासाठी १० हजार कोटी रुपये याप्रमाणे हे रोखे खरेदी करणार आहे.
रुपया वधारला
मुंबई ः आशियाई चलने सक्षम झाल्याचा परिणाम म्हणून भारतीय रुपयाही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गुरुवारी सावरला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2020, 4:00 am