अ‍ॅपशहर

जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल, फक्त २४ तासात अंबानींची संपत्ती इतक्या अब्ज डॉलरनी वाढली

Mukesh Ambani News: रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. अंबानी आता जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2022, 10:23 am
नवी दिल्ली: जगातील श्रीमंतांच्या (Top 10 Billionaires List) यादीत मंगळवारी एक मोठा फेरबदल झाला. यादीत झालेल्या बदलात भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना झाला. गेल्या काळापासून टॉप १० मधून बाहेर असलेल्या अंबानी यांनी आता पुन्हा एकदा अव्वल १० मध्ये स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mukesh Ambani


जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आता नवव्या स्थानावर पोहोचले आहेत. फोर्ब्सच्या रियल टाइम इंटेक्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासात १.५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या तेजीमुळे त्यांची एकूण संपत्ती (Mukesh Ambani Networth) ९५.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. संपत्तीत झालेल्या या वाढीमुळे मुकेश अंबानी यांनी सग्रेई ब्रिन यांना मागे टाकले आहे.

वाचा- वर्क फ्रॉम होममध्ये तुम्ही केलीय 'मुनलाईटिंग'; दिग्गज IT कंपनीचा मालक म्हणतो 'ही तर...

आघाडीच्या १० श्रीमंतांच्या यादीत आशिया खंडातील सर्वात व्यक्ती गौतम अदानी (Adani Net Worth) चौथ्या स्थानावर आहेत. मंगळवारी अदानी यांची संपत्ती १३८.६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. २०२२ या वर्षी गौतम अदानी यांची कमाई एलन मस्क आणि जेफ बेजोस यांच्यापेक्षा अधिक आहे.

यादीत पहिल्या स्थानावर टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क आहेत. मस्क यांची संपत्ती २५८.८ अब्ज डॉलर इतकी आहे. फ्रान्सचे बर्नाड अर्नाल्ट १६३.७ अब्ज डॉलरसह दुसऱ्या तर जेफ बेजोस १५७.७ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

वाचा- महागाईने त्रस्त कर्जदारांना पुन्हा एकदा 'शॉक', रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेणार

वॉरेन बफे यांना धक्का

मंगळवारी झालेल्या मोठ्या फेरबदलामध्ये अंबानी यांना फायदा झाला तर दिग्गज गुंतवणुकदार वॉरेन बफे यांना धक्का बसला. यादीत ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याची संपत्ती १००.३ अब्ज डॉलरने कमी झाली. बिल गेट्स ११२.२ अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आहेत. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आठव्या स्थानावर आहेत.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज