अ‍ॅपशहर

पर्यटनामुळे साडेचार कोटी रोजगार

भारतात पर्यटन क्षेत्र हे रोजगारक्षम आहे. या क्षेत्रात गुंतवणूक योग्य प्रकारे होत गेली तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी धोरणांची आखणी नीट झाली तर, २०२५पर्यंत या क्षेत्रात ४.६ कोटी रोजगार निर्माण होतील, असा विश्वास अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

Maharashtra Times 30 Jun 2016, 3:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतात पर्यटन क्षेत्र हे रोजगारक्षम आहे. या क्षेत्रात गुंतवणूक योग्य प्रकारे होत गेली तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी धोरणांची आखणी नीट झाली तर, २०२५पर्यंत या क्षेत्रात ४.६ कोटी रोजगार निर्माण होतील, असा विश्वास अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tourism to create 4 5 cr jobs
पर्यटनामुळे साडेचार कोटी रोजगार


वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम परिषदेच्या ताज्या अहवालानुसार भारतातील पर्यटन क्षेत्राचे जीडीपीत ६.३ टक्के योगदान आहे. हे क्षेत्र सध्या १२० अब्ज डॉलरचे असून २०१५मध्ये या क्षेत्रामुळे ३.७ कोटी रोजगार उपलब्ध झाले आहेत.

पर्यटन क्षेत्र वेगाने विस्तारण्यासाठी हवाई मार्गांचे जाळे अधिक होणे आवश्यक आहे. यामुळे देशांतर्गत तसेच परदेशांबरोबर संबंध अधिक दृढ होतील, याकडे वर्मा यांनी लक्ष वेधले. गेल्या वर्षी अमेरिकेतून भारतात सर्वाधिक पर्यटक आले. १२ लाख अमेरिकी लोकांनी भारतातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या, अशी माहितीही त्यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज