अ‍ॅपशहर

‘एसईझेड’मधील व्यवसायावर आयजीएसटी

विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात एसईझेडमधून उर्वरित देशात वस्तूंची विक्री केल्यास त्यावर इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) लागू होणार आहे.

Maharashtra Times 29 Jun 2017, 6:25 am
नवी दिल्ली: विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात एसईझेडमधून उर्वरित देशात वस्तूंची विक्री केल्यास त्यावर इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) लागू होणार आहे. ही माहिती केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम transactions from sez will be liable for igst
‘एसईझेड’मधील व्यवसायावर आयजीएसटी


एसईझेड हा व्यवसायासाठी देशातील परदेशी प्रदेश मानला जातो. या विशेष आर्थिक क्षेत्रातील व्यापार, शुल्क वेगळे असतात, ज्यांचा लाभ मुख्यतः निर्यातीसाठी होतो. आतापर्यंत, विशेष आर्थिक क्षेत्रातून क्षेत्राबाहेर पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंना सीमा शुल्क लागू होत असे. या वस्तू म्हणजे एसईझेडने उर्वरित देशाला केलेली निर्यात समजली जात असे. जीएसटीअंतर्गत निर्यात हा शून्य कर असलेला पुरवठा मानला गेला आहे.

यावर आयजीएसटी लागू झाल्यास आयातदारांना त्याचे रिफंड मिळेल. हे रिफंड इनपुट टॅक्स क्रेडिटच्या स्वरूपात मिळेल. हा परतावा मिळवण्यासाठी संबंधित पुरवठादाराकडे जीएसटीइन क्रमांक असणे गरजेचे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज