अ‍ॅपशहर

विदेशात फिरणे महागणार

सुट्यांच्या काळात तुम्ही विदेशात फिरण्याचा बेत बनवित असणार तर तुम्हाला यंदा अधिक खर्च करावा लागू शकतो. रुपयाच्या अवमूल्यनामुळे विदेशात फिरणे तुमच्यासाठी यंदा महागडे ठरू शकते....

Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am
joseph.bernard@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम foreign-tour


नवी दिल्ली : सुट्यांच्या काळात तुम्ही विदेशात फिरण्याचा बेत बनवित असणार तर तुम्हाला यंदा अधिक खर्च करावा लागू शकतो. रुपयाच्या अवमूल्यनामुळे विदेशात फिरणे तुमच्यासाठी यंदा महागडे ठरू शकते.

विमान प्रवासाचे भाडे, हॉटेलातील मुक्काम, स्थानिक वाहतूक, खानपान आणि शॉपिंगसाठी तुम्हाला याच कारणामुळे जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. रुपयाच्या अवमूल्यनाचा परिणाम परदेशात शिक्षण घेत असलेल्यांनाही जाणवणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दर गेल्या १५ महिन्यातील सर्वांत खालच्या स्तराला गेले आहेत. त्यामुळे एका डॉलरची किंमत ६७ रूपयांपेक्षा जास्त पोचली आहे.

आर्थिक ओझे वाढणार

रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. भारतात दरवर्षी सुमारे तीन लाख लोक उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. यातील बहुतांश लोक अमेरिका, कॅनडा येथे जातात. प्रदीर्घ कालावधीनंतर या देशातील 'प्राइस रिकव्हरी'ने येथील मुक्काम महाग केला आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्यांना आर्थिक ओझे सहन करावे लागु शकते.

पर्यटनावर परिणाम

कॅनडात ६ रात्र, ७ दिवस

आधी : १ लाख १३ हजार ६६५ रुपये

आता : १ लाख २८ हजार रुपये

अमेरिकेतील न्यू जर्सी, लॉस एज्नलीस, सॅन फ्रान्सिस्कोत १३ रात्र, १४ दिवस

आधी : २ लाख ६१ हजार रुपये

आता : २ लाख ९५ हजार रुपये

फ्रान्सच्या कान्स मॉन्टे कार्लोत ५ रात्र, ६ दिवस

आधी : ५९ हजार

आता :६७ हजार

(यात विमानभाडे समाविष्ट नाही)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज