अ‍ॅपशहर

‘उज्ज्वला’चे लाभार्थी २ कोटींवर

दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांना घरगुती गॅस मोफत उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींच्या घरात गेली आहे.

Maharashtra Times 6 Apr 2017, 3:00 am
नवी दिल्ली : दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांना घरगुती गॅस मोफत उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींच्या घरात गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘एक वर्षापेक्षा कमी कालावधीत लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींच्या घरात गेली आहे. ही आमच्यासाठी एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. गरीब महिलांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना क्रांतिकारक ठरली आहे,’ असेही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्यावर्षी १ मे रोजी उत्तर प्रदेशातील बलियामध्ये योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. लाकूड आणि कोळशाच्या माध्यमातून स्वयंपाक करणाऱ्या महिलांना सुरक्षित पर्याय देण्यासाठी उज्ज्वला योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ujjwala beneficiary reaches to 2 cr
‘उज्ज्वला’चे लाभार्थी २ कोटींवर


अडीच लाख पेटंट प्रतीक्षेत

नवी दिल्ली ः देशात तब्बल अडीच लाख पेटंट अर्थात स्वामित्व हक्क मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही पेटंट्स त्वरित मंजूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत सांगितले. त्याचप्रमाणे व्यापारचिन्हासाठी (ट्रेडमार्क) १ मार्चपर्यंत सात लाख ५३ हजार ४७१ अर्ज प्रलंबित असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रलंबित पेटंट अर्जांपैकी ४५ हजार ४३ अर्ज परीक्षणासाठी गेले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज