अ‍ॅपशहर

अर्थव्यवस्थेला खीळ; ग्रामीण भागात बेरोजगारी पुन्हा वाढली

सप्टेंबरमध्ये ५.८६ टक्क्यांवर असणारा बेरोजगारीचा दर ऑक्टोबरअखेर ६.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने नुकताच आकडेवारी जारी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2020, 1:02 pm
वृत्तसंस्था, नवी दिल्ली देशाची : अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये ६.६७ टक्क्यांवर असणारा शहरी बेरोजगारीचा दर ऑक्टोबरमध्ये ६.९८ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे. मात्र, ग्रामीण बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ५.८६ टक्क्यांवर असणारा बेरोजगारीचा दर ऑक्टोबरअखेर ६.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंजियन इकॉनॉमीतर्फे (सीएमआयई) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये हरियाणातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक २७.३ टक्के होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शहरी बेरोजगारीचे प्रमाण सात टक्क्यांवर


जनधन खातेधारकांना दिलासा ; शुल्क आकारणीबाबत सरकारने दिले 'हे' स्पष्टीकरण
'सीएमआयई'च्या मते करोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगभरातील अर्थव्यवस्था करोनामुळे प्रभावित झाल्या असून, त्यामध्ये भारताचाही हातभार लागला आहे. करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली असली तरी, हळूहळू का होईना ती पूर्वपदावर येऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत. चालू वर्षासाठी देशातील बेरोजगारीचा अंदाजित दर ५.४ टक्के निर्धारित करण्यात आला आहे.

बँकिंग शेअर तेजीत ; सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारला
बेरोजगारीत हरियाणा 'अव्वल'
बेरोजगारीच्या बाबतीत राज्यांमध्ये हरियाणाने (२७.३ टक्के) 'अव्वल' स्थान पटकावले आहे. त्यानंतर राजस्थान (२४.१ टक्के), जम्मू आणि काश्मीर (१६.१ टक्के) आणि हिमाचल प्रदेशचा (१३.५ टक्के) क्रमांक लागतो. सिक्कीममध्ये (०.९ टक्के) बेरोजगारीचा दर सर्वांत कमी आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर अनुक्रमे ३.८ टक्के, ९.८ टक्के आणि ३.१ टक्के असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय गुजरात आणि महाराष्ट्रात हाच दर अनुक्रमे ४ आणि ४.१ टक्के असल्याचे दिसून आले.

राज्यांचा ऑक्टोबरमधील बेरोजगारीचा दर

राज्य दर
हरियाणा २७.३ टक्के
राजस्थान२४.१ टक्के
जम्मू आणि काश्मीर१६.१ टक्के
हिमाचल प्रदेश१३.५ टक्के
झारखंड ११.८ टक्के

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज