अ‍ॅपशहर

Unemployment: भारतातील बेरोजगारी दर वाढला, हरियाणाची अवस्था बिकट तर महाराष्ट्राची स्थिती काय? वाचा

India Unemployment Rate: नोव्हेंबर महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकी ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सीएमआय ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात आकडेवारी समोर आली. शहरी भारतातील बेरोजगारीचा दर ग्रामीण भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे. बेरोजगारी दराच्या बाबतीत हरियाणा पुन्हा एकदा अव्वल आहे. जागतिक मंदी आणि चलनवाढीच्या पार्श्वभूमीवर २०२२ मध्ये देशातील बेरोजगारीचा दर खालीलप्रमाणे राहिला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2022, 10:22 am
नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, नोव्हेंबरमध्ये हा दर आठ टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकी दर ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर ७.७७ टक्के होता. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'ने (सीएमआयई) गुरुवारी (एक डिसेंबर) देशातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India Unemployment Rate


ISC,ICSE Exam Date 2023: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
'सीएमआयई'च्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरच्या (७.२१ टक्के) नोव्हेंबरमध्ये शहरी बेरोजगारीचा दर वाढून ८.९६ टक्क्यांवर गेला आहे. याच कालावधीत ग्रामीण बेरोजगारीचा दरही ८.०४ टक्क्यांवरून कमी होऊन ७.५५ टक्क्यांवर गेला आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरीची संधी, भरती प्रक्रियेविषयी जाणून घ्या

हरियाणामध्ये सर्वाधिक बेरोजगारी
'सीएमआयई'च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर (३०.६ टक्के) सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. तर, सर्वांत कमी दर छत्तीसगडमध्ये (०.१ टक्का) असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त पदे भरणार, जाणून घ्या तपशील

कसा ठरतो बेरोजगारीचा दर?
देशातील बेरोजगारीचा दर नोव्हेंबरमध्ये आठ टक्के आहे, याचा अर्थ काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या १००० कामगारांपैकी ८० जणांना काम मिळालेले नाही. 'सीएमआयई'तर्फे दर महा १५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांच्या रोजगारस्थितीची माहिती घेते. त्यातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांवरून हा अहवाल तयार केला जातो.

महत्वाचे लेख