अ‍ॅपशहर

कर्जदारांना दिलासा; 'युनियन','पीएनबी' बँकेची कर्जदर कपात

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, ​पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) रेपो आधारित कर्ज दरामध्ये कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2020, 10:50 am
मुंबई ः रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियानेही रेपो आधारित कर्ज दरामध्ये कपात केली आहे. युनियन बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर)मध्ये ०.४० टक्क्यांची कपात केली असून नवीन दर ६.८० टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. नवा दर सोमवारपासून लागू झाले. एमएसएमई उद्योगांना असलेल्या नव्या दराच्या कर्जासाठी युनियन बँक ईबीएलआर आधारित व्याजदर आकारते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कर्जदर


पीएनबीची कर्जे स्वस्त

पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) रेपो दरसंलग्न कर्जदरात (आरएलएलआर) ०.४० टक्के कपात केली आहे. यामुळे हा कर्जदर ७.०५ टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांवर आला आहे. याचप्रमाणे बँकेने एमसीएलआर दर ०.१५ टक्के कमी केला आहे. यामुळे अनेक कर्जदारांचे कर्जहप्ते किंवा कर्जकालावधी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

करोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. २२ मे रोजी त्यांनी रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केली. त्यामुळे बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. ६ जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करून बँकेने सामान्य कर्जदारांना दिलासा दिला. याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती (EMI Moratorium) देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि आॅगस्ट असे तीन महिने कर्जदारांची EMI मधून तात्पुरती सुटका होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज