अ‍ॅपशहर

युरिया अनुदानासाठी २०२० पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या युरिया अनुदानासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भविष्यात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे युरिया उपलब्ध व्हावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2018, 5:44 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम urea

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या युरिया अनुदानासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भविष्यात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे युरिया उपलब्ध व्हावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्राकडून शेतकऱ्यांना ५,३६० रुपये प्रतिटन या कमाल किरकोळ दराने युरियाचा पुरवठा करण्यात येतो. उत्पादन खर्च आणि या दरातील फरकाची रक्कम उत्पादकांना अनुदान स्वरूपात सरकारकडून भरपाई देण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थमंत्रालयाच्या समितीद्वारे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 'युरियासाठीची अनुदान योजना कायम राहिली तर याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे २०२० पर्यंत अनुदानाची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असे या समितीने सांगितले.

केंद्र सरकार शेतीसाठी देत असलेल्या खत अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्याचीही शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज