अ‍ॅपशहर

वाहनविक्रीत घट; मंदीची धग कायम

​प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत जानेवारी महिन्यात ४.६१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ऑटोमोबाइल डीलर्सची प्रमुख संघटना असणाऱ्या 'फाडा'च्या अहवालानुसार जानेवारीमध्ये २,९०,८७९ युनिट वाहनांची विक्री झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2020, 10:48 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत जानेवारी महिन्यात ४.६१ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ऑटोमोबाइल डीलर्सची प्रमुख संघटना असणाऱ्या 'फाडा'च्या अहवालानुसार जानेवारीमध्ये २,९०,८७९ युनिट वाहनांची विक्री झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जानेवारी महिन्यात वाहनविक्रीत घट


महागाईचे सावट; खनिज तेलात दरवाढ

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ३,०४,९२९ युनिट वाहनांची विक्री झाली होती. दुचाकी वाहनांची विक्री जानेवारीमध्ये ८.८२ टक्क्यांनी घसरून १२,६७,३६६ युनिटवर पोहोचली आहे. याच काळात व्यावसायिक वाहनांची विक्री ६.८९ टक्क्यांनी घसरून ८२,१८७ युनिटवर पोहोचली. जानेवारी २०१९मध्ये ही विक्री ८८,२७१ युनिट होती. तीनचाकी वाहनांची विक्री जानेवारी २०१९च्या तुलनेत ९.१७ टक्क्यांनी घसरून ६३,५१४ युनिटवर पोहोचली आहे. जानेवारी २०२०मध्ये एकूण वाहनांची विक्री ७.१७ टक्क्यांनी घसरून १७,५०,११७ युनिटवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १८,८५,२५३ वाहनांची विक्री झाली होती.

उद्योजक अडचणीत;करोनामुळे सुट्या भागांचा तुटवडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज