अ‍ॅपशहर

विनय क्षीरसागर यांना पुरस्कार

इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंग या जहाजांचे वर्गीकरण करणाऱ्या अधिकृत मध्यवर्ती नियामक संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) विनय क्षीरसागर यांना यावर्षीचा इंदिरा ब्रँड स्लॅम सीएफओ लीडरशिप पुरस्कार जाहीर झाला आहे.

Maharashtra Times 23 Sep 2017, 3:00 am
मुंबई ः इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंग या जहाजांचे वर्गीकरण करणाऱ्या अधिकृत मध्यवर्ती नियामक संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) विनय क्षीरसागर यांना यावर्षीचा इंदिरा ब्रँड स्लॅम सीएफओ लीडरशिप पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी पुण्याच्या इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला जातो. पुरस्काराचे वितरण २६ सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vinay kshirsagar
विनय क्षीरसागर यांना पुरस्कार


विनय क्षीरसागर हे सीए असून त्यांना वित्त, लेखा, कोश, प्रणाली व कॉर्पोरेट कर यांचा ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. यापूर्वी क्षीरसागर श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीत सीएफओ म्हणून १७ वर्षे कार्यरत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज