अ‍ॅपशहर

विश्वास बँकेला तीन पुरस्कार

ग्लोकल स्ट्रॅटेजिज् अँड सर्व्हिसेस, मुंबई या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना नुकतेच ‘फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँकिंग’ पुरस्कार दिले गेले. यामध्ये विश्वास सहकारी बँकेला यावर्षी एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत.

Maharashtra Times 1 Oct 2016, 3:00 am
मुंबईः ग्लोकल स्ट्रॅटेजिज् अँड सर्व्हिसेस, मुंबई या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांना नुकतेच ‘फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँकिंग’ पुरस्कार दिले गेले. यामध्ये विश्वास सहकारी बँकेला यावर्षी एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vishwas bank bags three awards
विश्वास बँकेला तीन पुरस्कार


नवी दिल्ली येथे झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ‘बेस्ट युथ सीईओ’, ‘बेस्ट न्यू हेड ऑफिस’ व ‘बेस्ट डिजिटल मार्केटिंग’ असे तीन पुरस्कार बँकेला प्रदान करण्यात आले. या समारंभात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे, उप महाप्रबंधक किशोर त्रिभुवन, व्यवस्थापक अनिता नेवे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पगारे व कनिष्ठ अधिकारी कुमुदिनी मोराणकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. बँकेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे यांना बेस्ट युथ सीईओ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बँकेने सोशल मिडियाचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाचा वापर करून अत्याधुनिक व तत्पर सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कार्यालयाला बेस्ट न्यू हेड ऑफिस पुरस्कार मिळाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज