अ‍ॅपशहर

वॉशिंग मशीन,ओव्हन , फ्रीज महागणार

उर्जा वाचवणारे (एनर्जी एफिशिएंट) वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओव्हन नोव्हेंबरपासून महागणार आहेत. तर जानेवारीपासून फ्रीजही महागणार आहे. उर्जा वाचवणाऱ्या उपकरणांवर काही नियम केंद्र सरकारने लागू केल्यामुळे या उपकरणांच्या किमतीत ८ ते १० टक्के वाढ होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2019, 3:50 pm
दिल्ली: उर्जा वाचवणारे ( एनर्जी एफिशिएंट) वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओव्हन नोव्हेंबरपासून महागणार आहेत. तर जानेवारीपासून फ्रीजही महागणार आहे. उर्जा वाचवणाऱ्या उपकरणांवर काही नियम केंद्र सरकारने लागू केल्यामुळे या उपकरणांच्या किमतीत ८ ते १० टक्के वाढ होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम washing machine freeze and oven prices to hike soon
वॉशिंग मशीन,ओव्हन , फ्रीज महागणार


ज्या उपकरणांवर स्टार्स असतात ते कमी उर्जा वापरतात. त्यांच्यामुळे वीजेचं बिलही कमी येतं. या एनर्जी एफिशिएंट उपकरणांवर एप्रिल २०१९पासून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च आणि पर्यायाने किंमतही वाढणार आहे. हे निर्बंध २०२०पर्यंत ऐच्छिक असोत २०२१ पासून बंधनकारक असणार आहेत. त्यानुसार अनेक कंपन्यांनी आपल्या स्टार्स असलेल्या उपकरणांच्या किमती वाढवल्या आहेत. पूर्वी २३,५०० रुपयांत मिळणारं मायक्रोवेव ओव्हन आता २५,००० रुपयांत मिळणार आहे. तर १४,००० रुपयांच्या वॉशिंग मशीनची किंमत १५,००० रुपये होणार आहे. ' सध्या टेलिव्हिजनच्या व्यवसायात मंदी असली, तर एसी आणि फ्रीजची विक्री मात्र जोरदार सुरू आहे.

त्यामुळे या दरवाढीचा जास्त परिणाम होईल असं वाटत नाही'. अशी माहिती एलजीचे व्हाइस प्रेसिडेंट विजय बाबू यांनी दिली आहे. तेव्हा या दरवाढीच्या ग्राहकांच्या क्रयशक्तीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज