नवी दिल्ली : किफायतशीर किंमतीत आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या वॉव एअरच्या भारतातील सेवेस नुकतीस सुरुवात झाली. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आइसलँड येथील रेकजेविकच्या दिशेने झेपावलेल्या विमान उड्डाणाने ही सेवा सुरू झाली. वॉवकडून भारतातून शिकागो, ओरलँडो, न्यूयॉर्क, डेट्रॉइट, बाल्टिमोर, बोस्टन, पिट्सबर्ग, लॉस एंजल्स, वॉशिंग्टन डीसी, टोरँटो, मॉण्ट्रियल आदी ठिकाणी विमानसेवा उपलब्ध असेल.
वॉव एअरची भारतात सेवा
किफायतशीर किंमतीत आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या वॉव एअरच्या भारतातील सेवेस नुकतीस सुरुवात झाली...
Maharashtra Times 12 Dec 2018, 4:00 am