अ‍ॅपशहर

आम्हीही भारतीयच : पेटीएम

‘पेटीएम’ची मालकी चिनी असल्याचे मेसेज सोशल मीडियात फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीतर्फे खुलासा करण्यात आला आहे. ‘ज्याप्रमाणे मारुती सुझुकी ही कंपनी भारतीय आहे, त्याचप्रमाणे पेटीएमही भारतीयच आहे,’ असा दावा कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केला आहे.

Maharashtra Times 28 Nov 2016, 5:46 am
मुंबई : ‘पेटीएम’ची मालकी चिनी असल्याचे मेसेज सोशल मीडियात फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीतर्फे खुलासा करण्यात आला आहे. ‘ज्याप्रमाणे मारुती सुझुकी ही कंपनी भारतीय आहे, त्याचप्रमाणे पेटीएमही भारतीयच आहे,’ असा दावा कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केला आहे. ‘आम्ही भारताचे प्रतिनिध‌ित्व करतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. एके काळी मारुतीमधील सर्वाधिक हिस्सा केंद्र सरकारच्या ताब्यात होता. आता संपूर्ण कंपनी सुझुकीच्या अधिपत्याखाली आहे. गेल्यावर्षी चीनच्या अलिबाबा समूहाने पेटीएममध्ये ६८० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली असून, त्यांचा हिस्सा ४० टक्के आहे,’ असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज