अ‍ॅपशहर

शून्य कर असलेल्या देशांशी संबंध तोडा

शून्य कर असलेल्या (टॅक्स हॅवन) देशांशी जगाने संबंध ठेऊ नयेत, त्यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, असे आवाहन जगभरातील ३०० अर्थतज्ज्ञांनी केले आहे. येथे झालेल्या भ्रष्टाचारविरोधी परिषदेत याविषयीचे एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले. या परिषदेला ४० देशांचे प्रतिनिधी तसेच जागतिक बँक व जागतिक नाणेनिधी यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते.

Maharashtra Times 10 May 2016, 3:00 am
जगभरातील ३०० अर्थतज्ज्ञांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम world should cut off with tax haven nations appeal 300 economists
शून्य कर असलेल्या देशांशी संबंध तोडा


वृत्तसंस्था, लंडन शून्य कर असलेल्या (टॅक्स हॅवन) देशांशी जगाने संबंध ठेऊ नयेत, त्यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, असे आवाहन जगभरातील ३०० अर्थतज्ज्ञांनी केले आहे. येथे झालेल्या भ्रष्टाचारविरोधी परिषदेत याविषयीचे एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले. या परिषदेला ४० देशांचे प्रतिनिधी तसेच जागतिक बँक व जागतिक नाणेनिधी यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते.

ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एका गटाने जगभरातील सर्व अर्थतज्ज्ञांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. या सर्व अर्थतज्ज्ञांनी यासंदर्भात एक पत्र तयार केले आहे. शून्य कर असलेल्या देशांमध्ये पैसे साठवल्यास त्यामुळे श्रीमंत लोक तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या यांनाच केवळ फायदा मिळत आहे. त्यामुळे जगात विषमता वाढीस लागत असल्याचे या पत्रात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.

शून्य कर असलेल्या देशांमध्ये पैसे साठवल्यामुळे गरीब राष्ट्रांना याचा फार मोठा फटका बसतो आहे. यातून बाहेर पडण्यासाठी या देशांनी स्वतःभोवतीचे गूढ वलय तोडून सर्व माहिती खुली करावी, असे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज