रिलायन्स इंडस्ट्रिजने गुरुवारी घोषित केलेल्या 'जिओफोन-टू'ची किंमत २,९९९ रुपये असून तो १५ ऑगस्टपासून उपलब्ध होईल, असे जिओने म्हटले आहे. फेसबुक, व्हॉटसअॅप, यूट्युबची सुविधा असलेल्या या फोनवर कोणतीही सवलत नसून जिओच्या पहिल्या फोनवर मात्र विशेष सवलत देण्यात आली आहे. जिओने गेल्या वर्षी १५०० रुपयांत दाखल केलेला जिओ फीचर फोन आता ५०१ रुपयांना मिळू शकेल. कोणताही जुना फीचर फोन जिओकडे जमा केल्यास त्या बदल्यात ग्राहकांना १५०० रुपयांचा जिओ फोन ५०१ रुपयांत मिळेत, अशी माहिती जिओतर्फे देण्यात आली.
जिओ फोनवर सवलत
रिलायन्स इंडस्ट्रिजने गुरुवारी घोषित केलेल्या 'जिओफोन-टू'ची किंमत २,९९९ रुपये असून तो १५ ऑगस्टपासून उपलब्ध होईल, असे जिओने म्हटले आहे...
Maharashtra Times 7 Jul 2018, 4:00 am